विधान परिषद निरोप समारंभ.

विधान परिषद निरोप समारंभ.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

आज विधान परिषदेतील माझ्यासह माजी मुख्यमंत्री आ.उद्धवजी ठाकरे उपसभापती आ.निलमताई गोऱ्हे आ.अमोल मिटकरी आ.राजेश राठोड आ.संदीप जोशी आ.दादाराव केचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील आ.संजय केणेकर या सर्व माननीय सदस्यांचा मे २०२६ मध्ये कार्यकाळ पूर्ण होत आहे.मला चार वेळा विधानसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि स्व.अजितदादा पवार यांच्या विश्वासामुळे मला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे.विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम करण्याचा अनुभव लाभला याचे मला विशेष समाधान आहे.यापैकी विधान परिषद हे माझे अत्यंत आवडते सभागृह राहिले सदस्यसंख्या कमी असल्यामुळे येथे शेतकऱ्यांचे कामगारांचे तरुणांच आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळते.प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्याची आणि आपले विचार मांडण्याची मोकळीक येथे अनुभवता आली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आज सभागृहात आमचा निरोप समारंभ पार पडला.हा क्षण निश्चितच भावनिक आणि संस्मरणीय आहे.या संपूर्ण कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे.माझ्यामध्ये असणार वक्तृत्व,आक्रमकपणा या सर्व गुणांचा या सभागृहात काम करत असताना मला प्रभावीपणे वापर करता आला.या प्रवासात ज्यांनी मला सहकार्य केले मार्गदर्शन केले आणि साथ दिली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.