अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन.

अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन.

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

वारकरी परंपरेचा वारसा जपत उंबरमळे (ता. खटाव) येथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वै. गुरुवर्य पुराणीक महाराज बीड, यांच्या कृपाशिर्वादाने गुरुवार (ता. २5 मार्च) ते गुरुवार (ता. 1 एप्रिल) या कालावधीत हा सप्ताह पार पडणार आहे.या पारायण सप्ताहात दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, हरिपाठ, कीर्तन व जागर असे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवार (ता. २5 मार्च) रोजी व्यासपीठ चालक ह.भ.प. दिलीप लावंड, किसन वलेकर, बापूराव वलेकर तसेच उंबरमळे येथील पारायण मंडळाचे सर्व वारकरी व भाविक यांच्या उपस्थितीत सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
सप्ताहात ह.भ.प. धीरज शास्त्री महाराज वलेकर, उंबरमळे 
ह.भ.प.अशोक महाराज, बानुगडेवाडीकर
ह.भ.प. मारुती महाराज पवार, सातारा
ह.भ.प. सोमनाथ महाराज घोगरे, नातेपुते
ह.भ.प. धनश्याम महाराज लावंड, खातगुण 
ह.भ.प. उमेश महाराज  किर्तद, चिंचनेर
ह.भ.प. संस्थान महाराज, मानेवाडी
ह.भ.प. अंकुश महाराज कदम, गोडसेवाडी
भावपूर्ण कीर्तने होणार आहेत.
काकड, हरिपाठ  ह.भ.प. धीरज महाराज, ह.भ.प. राजेंद्र महाराज, छ.संभाजीनगर ह.भ.प. हरि महाराज व कीर्तन सेवेसाठी हार्मोनियमवर ह.भ.प.विठ्ठल पाटोळे, बाळासाहेब वलेकर, मृदंगावर ह.भ.प. शुभम कदम, आदर्की, संजय वलेकर, संजय इनामदार, प्रसाद पाटोळे, तसेच वीणेसाठी ह.भ.प. दशरथ पाटोळे व चोपदार ह.भ.प. आडके महाराज, आंधळी किर्तन महाराज यांची साथ लाभणार आहे. तसेच उंबरमळे, शिंदेवाडी, कोळेवाडी येथील महिला भजनी मंडळाकडून जागरणाचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करून त्यानंतर भव्य दिंडी सोहळा व महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
त्यानंतर दि.01.04.2026 रोजी झी टॉकीज फेम प्रसिध्द भारुडरत्न ह.भ.प. कृष्णा महाराज जोगदंड, कामखेडा (लातूर) यांचे भारुडी भजन , दि.02.04.2026 रोजी हनुमान देवाचा जन्मोत्सव साहेळा पालखीतून भव्य मिरवणूक (छबिना) दि.03.04.2026 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते मा.श्री.जयवंत आवटे, कुंडल, जि.सांगली यांचा “जाऊ आनंदाच्या गावा” या विषयावर पोट धरुन हसायला लावणारे विनोदी व्याख्यान सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी सौजन्य देवून सहकार्य केले आहे.
या पवित्र सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.