माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.

राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या भरघोस निधीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
फलटण-कोरेगाव मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी कायम झुकते माप दिले असल्याची भावना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली असून, मंजूर झालेली सर्व विकासकामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते, दळणवळण तसेच पायाभूत सुविधांच्या अनेक महत्त्वाच्या विकासकामांना चालना मिळणार आहे.फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारातूनफलटणमध्ये प्रशासकीय इमारत, महसूल भवन, शहरातील पालखी महामार्ग, अंतर्गत रस्ते, तारांगण तसेच आधुनिक स्टेडियम यांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पांपैकी बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरु झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. फलटण मतदार संघासाठी पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पात भारीव निधी मंजूर झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. मंजूर झालेल्या निधीतून मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण,मजबुतीकरण, काँक्रीटीकरण तसेच गटार व संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सासवड, भाडळे बु. सोनवडी, विडणी, सांगवी रस्ता, गिरवी, मांडवखडक, निरगुडी, निंभोरे, जिंती, कोहाळे मार्ग, काळज, सासवड, हिंगणगाव, सालपे रस्ता, जिंती, साखरवाडी, नांदल, वाघोशी, उपळवे, गिरवी मार्ग, कांबळेश्वर रोड ते सोमंथळी रस्ता, आरडगाव, हिंगणगाव रस्ता, गिरवी दुधेवावी राजाळे सांगवी मार्ग, भुईंज, देगाव, राऊतवाडी, पिंपोडे रस्ता, तसेच वाई, परखंडी, साळशी, पिंपोडे मार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण जोडरस्त्यांची सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सासवड, नायगाव, राजुरी,टाकळवाडे, कुरवली, गिरवी, सांगवी, ठाकुरकी, तावडी, पिंपळवाडी, फडतरवाडी, सुरवडी, सोनवडी, ढवळ, तरडगाव, जाधववाडी, जाध गुणवरे, निंबळक, कापडगाव या गावांमधील विविध जोडरस्ते मजबूत करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच गटार बांधकाम करण्यात येणार आहे. निरगुडी येथील लांडगेवस्ती रस्त्यावर ओढ्यावर पूल उभारणे तसेच गुणवरे ते मठाचीवाडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे यासारख्या कामांचाही या निधीत समावेश आहे. एकूण ९३ कोटी ३५ लाख रुपयांच्या या विकासकामांमुळे फलटण-कोरेगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते जाळे अधिक सक्षम होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.