हरभरा 5875 रुपये दर नोंदणीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
केंद्र शासनाच्या नाफेड अंतर्गत हरभरा खरेदि नोंदणीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हरभरा हमीभाव 5875 आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन येस ग्रुप संस्थापक संजय भगत यांनी केले.केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नाफेड अंतर्गत येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी चे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र वर्धनगड पुसेगाव रोड येथे हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू असून शेतकऱ्यांनी सातबारा व आधार कार्ड घेऊन नोंदणीस यावे कंपनी कार्यालयात यावे असे आवाहन संजय भगत यांनी केले आहे
ऑनलाईन सातबारा वरती ई-पिक पाहणी हरभरा नोंद असणे आवश्यक आहे जर हरभरा नोंद नसेल तर तलाठी किंवा तलाठी सहाय्यक यांना नोंद करण्याचा अधिकार असून त्वरित नोंदणी करून घ्यावी व शेतकऱ्यांनी सरकारच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असेही संजय भगत म्हणाले.नाफेडच्या सोयाबीन हमीभाव योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी लाभ घेतला या मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसे हे चार ते पाच दिवसात खात्यावर जमा झाले आपल्या येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीची कार्यालयीन यंत्रणा सक्षम आहे यामुळेच काही शेतकऱ्यांना त्वरित त्यांच्या मालाची रक्कम ही खात्यावर जमा झाल्यामुळे शेतकऱ्यां मध्ये समाधान व आनंद आहे सोयाबीन खरेदी वेळी खटाव कोरेगाव तसेच सातारा तालुक्यातील ही शेतकऱ्यांनी या तत्पर सेवेचा लाभ घेतला ही आमच्या कंपनीच्या व केंद्राच्या वतीने अभिमानास्पद गोष्ट आहे यामुळे हमीभाव योजनेवर विश्वास आर्यता वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी 9607175195 - 8530566503 या नंबर वरती संपर्क करावा असेही संजय भगत म्हणाले
महत्वाची चौकट शासनाच्या नाफेड अंतर्गत हमीभाव योजनेत येस फ्रेश मध्ये सोयाबीन विक्री केलेल्या काही शेतकऱ्यांना मालाची रक्कम तिसऱ्या दिवशी बँक खात्यावर जमा झाली यावेळी शेतकऱ्यांनी कंपनी कार्यालयात व शेतकऱ्यांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला होता.
Comments
Post a Comment