राहुल अशोक निंबाळकर यांची फलटण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण सभापतीपदी निवड:-
फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल
नगरपरिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी आज रोजी दि 26 फेब्रुवारी रोजी 'बिनविरोध' पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.प गट )शहर अध्यक्ष आणि लोकनियुक्त नगरसेवक राहुल अशोक निंबळकर यांची फलटण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर, आमदार सचिन पाटील,लोकनियुक्त नगर अध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर यांनी राहुल निंबाळकर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तेसेच विविध स्तरातून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment