फलटण एज्युकेशन सोसायटी चे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

फलटण एज्युकेशन  सोसायटी चे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

श्रीमंत निर्मलादेवी बालक व  प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेमध्ये ७७ वा भारताचा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेच्या व्हा.चेअरमन मा.सौ.वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीगीत ,ध्वजगीत,राज्यगीत  विद्यार्थ्यांनी तालासुरात  म्हणत सौ.सुषमा गोसावी यांनी संविधान वाचन व साक्षरता शपथ वाचन केले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर देशमुख  सदस्या  मा.निर्मला रणवरे मॅडम  ,रणरागिणी बहुउद्देशीय  संस्था अध्यक्ष मा.श्री.इम्रान सय्यद  उपाध्यक्ष  मा.श्री. अतुल शहा उपस्थित होते. यावेळी   रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे व हिंदी जिल्हास्तरीय परीक्षेचे व बालक मंदिर च्या विविध  स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात  आले . मुख्य आकर्षण  म्हणजे सीमेवर लढणारे  माजी सैनिक, आजी  सैनिक  व त्यांच्या पत्नी यांचेही सन्मानपूर्वक  स्वागत करण्यात आले.  यानंतर इयत्ता बालवाडीचे  योगा प्रात्यक्षिक ,इ.1ली पंखा कवायत ,इ.2री लेझीम,इ.3री  मानवी मनोरे सादर करत देशप्रेम  व्यक्त केले  . आसाम येथे लढणा-या माजी सैनिक  पत्नी  सौ.चव्हाण  यांनी शाळेचे आभार व्यक्त  करत सैनिकांची कौटुंबिक  कथा गाण्यातून व्यक्त केली .उपस्थित  मान्यवर, पालक ,शिक्षक  ,विद्यार्थी सैनिकांच्या शूर पराक्रमाचे शब्द  ऐकून भारावून गेले.सैनिकांचे ॠण न फिटण्यासारखेच असतात हे वेगळे सांगण्याची गरजच नाही .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ.कर्णे, आभार  सौ.टेंबरे तर बक्षीस  यादी वाचन सौ.शुभांगी पवार यांनी केले .संपन्न झाला यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कर्णे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार सौ. टेंबरे मॅडम यांनी केले मुख्याध्यापिका सौ.जाधव व सौ.खलाटे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम  उत्साहात पिर पाडला .पालकांची उपस्थिती  बहूसंख्य होतीच   शेवटी श्रीम. निर्मला रणवरे यांनी फलटण एज्युकेशन  सोसायटीच्या वतीने सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत नुकतेच सातारा जिल्ह्यातील शहीद झालेले जवान व नविन भरती झालेले जवान भारत देशात सर्वाधिक  असून त्याचा आपण जिल्हावासियांना सार्थ अभिमान  आहे  याची जाणीव  करून दिली . अशाप्रकारे वैविध्यपूर्ण  उपक्रमांनी कार्यक्रम  संपन्न  झाला  .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व  शिक्षक  व शिक्षकेतर  कर्मचारी यांनी परिश्रम  घेतले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.