वर्धनगडच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी; अक्षय सावंत यांची इंडिगो एअरलाईन्समध्ये 'पायलट' पदी निवड.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
स्वप्न पाहण्याची जिद्द आणि ते पूर्ण करण्याची चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणे पडते, हे वर्धनगडच्या सुपुत्राने सिद्ध करून दाखवले आहे. खटाव तालुक्यातील वर्धनगड गावचे सुपुत्र अक्षय तानाजी सावंत यांची प्रतिष्ठित 'इंडिगो एअरलाईन्स'मध्ये पायलट (वैमाणिक) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिद्दीचा प्रवास: शिक्षणाचा टप्पाअक्षय यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले स्वप्न प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून (TC College) त्यांनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. लहानपणापासूनच आकाशात झेपावण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अक्षय यांनी त्यानंतर वैमाणिक प्रशिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित केले.कठोर परिश्रम आणि यशअक्षय यांनी गुजरात येथील 'ब्ल्यू एव्हिएशन' (मैसाना) येथून वैमाणिक प्रशिक्षणाचा खडतर कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची आणि जिद्दीची पावती म्हणून त्यांची निवड आता 'इंडिगो' सारख्या नामवंत एअरलाईनमध्ये झाली आहे.
कौटुंबिक पाठबळअक्षय हे प्रा. तुकाराम सावंत सर यांचे पुतणे आणि कै.तानाजी सावंत यांचे चिरंजीव आहेत. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही पालकांनी त्यांच्या स्वप्नांना दिलेल्या बळामुळेच आज अक्षय आकाशाला गवसणी घालू शकले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.अक्षय, आकाशाला गवसणी घालण्याचे तुझे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. अशीच उंच भरारी घे आणि यशाच्या शिखरावर चमकत राहा!" अशा शुभेच्छा कुटुंबिय आणि मित्रपरिवाराकडून देण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment