औंध उपसा सिंचन व रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची कामे त्वरित पूर्ण करा:-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

औंध उपसा सिंचन व रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची कामे त्वरित पूर्ण करा:-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम 

 राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या दालनात औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे - पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत आढावा घेत, सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी या दोन्ही योजनेचे उपरोक्त सर्व विषय मार्गी लागतील अशा पाद्धतीने त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 
औंध उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधसह 21 गावांच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी, आणि रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणारी महत्त्वाची योजना असून, या योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेची कामे जलदगतीने पूर्ण होऊन लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत तिचा फायदा पोहोचावा, यासाठी राज्य शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.