पुसेगाव सुवर्णनगरीमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन:-युवा नेते गौरव जाधव.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी दिली.येथील श्री सेवागिरी मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९) दिवसभर चालणार्या या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ऑन-द-स्पॉट मुलाखती घेऊन ऑन-द-स्पॉट नियुक्ती पत्र देखील देणार आहेत.पाचवी ते सर्व शाखांतील पदवीधर, पदवित्तर उमेदवारांना रोजगाराच्या भरपूर संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहेत. पुसेगाव व परिसरातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह मेळाव्यात सहभागी व्हावे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा,असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment