रामोशीवाडी जाखणगाव येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो गांजा जप्त.

रामोशीवाडी जाखणगाव येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो गांजा जप्त.


 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलिसांच्या वतीने रामोशीवाडी जाखणगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो वजनाचा गांजा येथील येथील सगु वहिनी वस्तीवरील सचिन बापू मदने यांचे रानातून जप्त करण्यात आला.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून ही माहिती प्राप्त झाली पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रामोशीवाडी पोस्ट जाखनगाव येथे सगु वहिनीच्या वस्ती शेजारील आडोशाला गांजाचे विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची झाडांची लागवड केलेली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थागुशा कडील पोउनि परितोष दातीर व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करून व पुसेगाव पोलीस स्टेशन सपोनी संदीप पोमन व त्यांचे कडील ठाणे अंमलदार यांची मदत घेऊन संयुक्तपणे मिळालेल्या माहिती ठिकाणी  छापा टाकला असता त्या ठिकाणी संशयित इसम सचिन बापू मदने वय 35 वर्ष त्याने रहात असलेल्या झोपडीलगत आडोशाला एकूण नऊ झाडाची गांजाची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी छापा कारवाई दरम्यान 2 लाख 78 हजार 900 रुपयाचा 11 किलो गांजा मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी सातारा अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पोमन,स्थागुशा कडील पोउनि पारितोष दातीर, सातारा व पुसेगावचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.