शासनस्तरावरून थकबाकीचे अनुदान पाठवासेवानिवृत संघटनेची मागणी : शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

शासनस्तरावरून थकबाकीचे अनुदान पाठवा
सेवानिवृत संघटनेची मागणी : शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

गोंदिया :* जिल्हा परिषदेच्या वतीने पेंशन, अंशराशीकरण, उपदान, संगणक, अतिरिक्त घरभाडे, मेडिकल बिल व इतर थकबाकीची रक्कम प्रलंबित राहत आहे. अनुदान नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. जि.प.कडून मागणी केल्याप्रमाणे शासनस्तरावर अनुदान दिले जात नाही. यामुळे समस्या निर्माण होत आहे. परिणामी अनुदान पाठविण्यात यावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा सेवानिवृत्त  शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. दरम्यान सेवानिवृत्तांच्या समस्या सांगून त्या मार्गी लावण्यात यावे, अशी विनंती निवेदनातून केली. जि.प.प्रशासनाच्या वतीने जिल्हातील सेवानिवृत शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्या सेवानिवृत संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचे कार्य करीत आहेत. परंतु, अनुदानाअभावी अनेक प्रकरण प्रलंबीत  राहत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने शासनस्तरावर अनुदानाची मागणी केली जाते. परंतु, मागणीप्रमाणे शासनाकडून अनुदान पाठविण्यात येत नाही. ते अनुदान त्वरीत पाठविण्यात यावे, शासनाकडून सर्व प्रकारचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या आत पाठविणे, ७, ८ व ९ जुलै २०१८ चा संपकालीन वेतन देणे, एकस्तर वेतन श्रेणी लावतांना गोदिया जिल्ह्यात होत असलेला दुजाभाव दूर करणे, आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न निकाली काढणे, पेंशन दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत देणे आदि मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.याप्रसंगी सेवानिवृत संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे, राज्य उपाध्यक्ष पी.आर.पारधी, डी.एल.गुप्ता, उपाध्यक्ष टी.बी.भेंडारकर, डी.एम.दखने,  सुरेश आष्टीकर, विद्याताई अवधूत, इमला भगत व सभासद उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.