श्री.कृष्णात कुंभार यांची महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड.

श्री.कृष्णात कुंभार यांची महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे पुणे विभागीय अधिवेशन पुणे येथे संपन्न झाले. सेवानिवृत्तांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी कार्यतत्पर संघटना म्हणून काम करत आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री.कृष्णात बारीकराव कुंभार तालुका फलटण यांची निवड करण्यात आली.कृष्णात कुंभार गुरूजी यांनी 38 वर्षे 7 महिने प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून आदर्श सेवा बजावली आहे.त्याच बरोबर प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये संघटक ते नेते पदापर्यंत विविध पदांवर काम केले आहे. आदर्श शिक्षक म्हणून सेवा करत असताना वाखरी गावात संत तुकाराम वाचनालय, नेहरू युवा मंडळाची स्थापना केली. कोरोना काळात मित्रमंडळींच्या मदतीने शेकडो लोकांना वैद्यकीय, आर्थिक व मदत केली .संत तुकाराम महाराज बिजोत्सव, गणेशोत्सव मंडळ ,पारायण मंडळात सक्रिय सहभाग असतो.तसेच वाखरी येथे सेवानिवृत्त कर्मचारी संघ स्थापन करून अध्यक्ष पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळत सदस्यांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.विविध सामाजिक  शैक्षणिक उपक्रमात सहभागी असल्याचे कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल मा.मधुकर जंगम राज्याध्यक्ष, मा.जनार्दन घाडगे विभागीय प्रसिध्दी प्रमुख, मा.मा ए खाडे जिल्हा अध्यक्ष,मा.आण्णासाहेब शेवते सरचिटणीस,मा.र.ना. कुंभार तालुकाध्यक्ष,मा.शं.ज्ञा.कांबळे साहेब सरचिटणीस,मा.ओंबासे साहेब,मा.मारूती मोहिते साहेब, वाघमारे साहेब, तानाजी डांगे साहेब, पत्रकार स.रा.मोहिते साहेब, संघटनांचे पदाधिकारी, सेवानिवृत्त संघ वाखरी,मित्रमंडळ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.