वर्धनगड येथील किरकोळ वादातुन पती-पत्नीस बेदम मारहाण व पती गंभीर जखमी.

वर्धनगड येथील किरकोळ वादातुन पती-पत्नीस बेदम मारहाण व पती गंभीर जखमी.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम 

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वर्धनगड तालुका खटाव येथील चव्हाणवाडी मध्ये पती-पत्नी बेदम मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे मारहाण करणार्‍या व धमकी देणाऱ्या इसमानवर गुन्हा रजिस्टर झाला असून यामध्ये सविस्तर हकिकत अशी दिनांक 16. 7.2025 वार बुधवार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी येथील आरोपी महादेव एकनाथ चव्हाण.  यांनी फिर्यादी सीमा उमेश चव्हाण व उमेश एकनाथ चव्हाण.यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून म्हशीच्या गोठ्यात जाणाऱ्या रस्त्याने जायचे नाही व रस्त्यालगतची लावलेली झाडे तुम्ही  मोडाल असे म्हणून महादेव एकनाथ चव्हाण ,अभिजीत महादेव चव्हाण ,अर्चना महादेव चव्हाण या तिघांनी संगमत करून सीमा चव्हाण व त्यांचे पती उमेश चव्हाण यांना मिरची पावडर डोळ्यांमध्ये टाकून लाकडी दांडक्याने व लोखंडी धारबाज वस्तूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून  या मारहाणी मध्ये सीमा चव्हाण ह्या लोखंडी धारवाज वस्तूने त्यांच्या अंगावरील वार करणाऱ्या कडून त्या वाचले असून तो वार त्यांच्या हाताच्या अंगठ्यावर लागला आहे. तर त्यांच्या पती उमेश चव्हाण यांना ओठावर ,हनुवटीवर, छातीवर मारून गंभीर जखमी केले आहे म्हणून त्यांच्या विरोधात सीमा उमेश चव्हाण यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असल्याची नोंद झाली आहे. पुढील तपास पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.