शिक्षक संघटनेच्या मोर्चाला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जाहीर पाठींबा.

शिक्षक संघटनेच्या मोर्चाला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जाहीर पाठींबा.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

पुसेगाव दि.10

 गेल्या कित्येक वर्षांपासून संस्था ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,शारीरिक शिक्षण, कला व ग्रंथपाल शिक्षक यांचे विविध प्रश्न शासनाने प्रलंबित ठेवले आहेत.प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्राबाबत शासन उदासीन असून विविध संस्थांच्या उदात्तीकरणाबाबत ,मुख्याध्यापक संघ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शासन काहीही ठोस पाऊले उचलत नसल्याचे दिसून येत आहे,उद्या  जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जाहीर पाठींबा देण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ विलास खंडाईत व सचिव प्रा गोविंद वाघ यांनी दिली आहे. सहभागी ४२५ शिक्षण संस्था, मुख्याध्यापक संघ , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सघटना , शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना , कला शिक्षक संघटना , ग्रंथपाल संघटनांना प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रावर अन्याय होत असून  संस्था प्राचार्य,मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी आज  साताऱ्यात निघणाऱ्या मोर्चा साठी  जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जाहीर पाठींबा केला आहे.या मोर्चात सहभागी ४२५ शिक्षण संस्था, मुख्याध्यापक संघ , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सघटना , शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना , कला शिक्षक संघटना , ग्रंथपाल संघटनांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे पाठबळ राहणार आहे.शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात यावी. 1 नोहेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित द्यावी.शाळांचे वेतनेतर अनुदान सातव्या वेत आयोगाच्या वेतनावर देण्यात यावे. 15 मार्च 2024 चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही व्हावी.ई.11 वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे करण्यात यावी. हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवावा. आदी मागण्यांच्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. यावेळी 
प्रा. गोविंद वाघ (सचिव) , प्रा. दशरथ जाधव ( कार्याध्यक्ष ) , प्रा. केदार होगले ( विभागीय प्रतिनिधी ) , प्रा. सुनिल शिंदे (उपाध्यक्ष ) , प्रा. उदयराज माने (संघटक ) , प्रा. सौ. प्रमोद राऊत ( कोषाध्यक्ष ) , प्रा. बापूराव पाटील ( माजी अध्यक्ष ) प्रा.सौ. सुवर्णा कोळी ( कायदेशीर सल्लागार ) आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.