भाजप युवा मोर्चाच्या वतीने १९७५ च्या आणीबाणीत कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सन्मान.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
'मॉक पार्लमेंट' मध्ये खासदारांनी दीला १९७५ च्या आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा
लोकशाहीवरील काळी छाया ठरलेल्या १९७५ च्या आणीबाणीच्या विरोधात 'मॉक पार्लमेंट' (काल्पनिक संसद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९७५ च्या आणीबाणीत कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयोजित 'मॉक पार्लमेंट' मध्ये खासदारांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा दीला.यामध्ये मला काल्पनिक संसदेत पंतप्रधान पदी काम करायला मिळाले.तरुण पिढीला आणीबाणीच्या काळातील घटनांची जाणीव करून देण्यासाठी व लोकशाही मूल्यांची जपणूक कशी करावी यावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये तरुणांनी संसदेसारखे वातावरण निर्माण करून त्या काळातील घटनांवर चर्चा, वादविवाद, आणि प्रश्नोत्तरांची सत्रे सादर केली. यामध्ये तत्कालीन सरकारच्या निर्णयांचे विश्लेषण, विरोधी पक्षांची भूमिका, आणि जनतेवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला.तरुणांनी कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे, भाजपयुमोचे प्रदेशअध्यक्ष अनुप मोरे, मा.आ.दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, सुनिल तात्या काटकर, प्रदेशउपाध्यक्ष संग्राम बर्गे, चिन्मय कुलकर्णी,प्रा.दशरथ सगरे, अनील बोधे, सुदर्शन पाटसकर, प्रियाताई पवार, संतोषभाऊ कणसे, विठ्ठल बलशेटवार,सागर शिवदास, दिपक नलवडे,अविनाश खर्शिकर,विकास गोसावी,प्रवीण शहाणे,व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment