डिस्कळ येथील दरोड्यातील आरोपीना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
तक्रारदार यांची देवराज शिंदे रा. डिस्कळ ता. खटाव यांच्या सोबत ओळख झाल्यानंतर तक्रारदार यांची बहीण प्रतीक्षा हिचे लग्नाचे टेट्स ठेवले होते ते टेट्स देवराज शिंदे याने पाहून तक्रारदार प्रवीण महादू मेचे रा. पुणे पिंपरी चिंचवड यांना मोबाईल वरून कॉल करून तूझ्या बहिणीच्या लग्नासाठी कमी पैस्यात सोने देतो असे सांगून तू बहिणीच्या लग्नाच्या वेळी 1,20,000रु. घेऊन माझे कडे डिस्कळ येथे ये व मी तुला तेवढ्या रकमेमध्ये माझ्याकडील दहा तोळे सोने तुला देतो असे सांगितले व मोबाईल वरून डिस्कळ गावचे लोकेशन टाकले व डिस्कळ येथे येण्यास सांगितलेने तक्रारदार हे त्यांचा मित्र ऋषिकेश भोर यांच्यासोबत डिस्कळ येथे दि.19,6,25रोजी देवराज शिंदेयांच्या घरी पोहचले त्यांचदिवशी दुपारी 1,30 वाजण्याच्या सुमारास प्रथम त्याच्या घरातील व नात्यातील आई शानू अमित शिंदे. आजी शिक्षण लाहूर शिंदे. व इतर नातेवाईक सुष्मा सुविचार शिंदे. मीना लाहूर शिंदे. सुमित सुविचार शिंदे. सर्व राहणार डिस्कळ तालुका खटाव व अनिल उर्फ अनिमोल गोगज्या शिंदे रा. फलटण या सर्वांची त्यांना ओळख करून दिली. त्यावेळी तक्रारदार देवराज शिंदे यांना म्हणाले मी आत्ता 1,20,000 रु. देतो तू मला दहा तोळे सोने दे त्या क्षणी तक्रारदार व त्यांचे मित्र ऋषिकेश भोर यांना चार ते पाच अनोळखी मुलांनी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडून उकडून तक्रारदार यांच्या खिशातील 1,20,000 रु. शिक्षण लाहूर शिंदे हिने खिशात हात घालून जबरदस्तीने इस्कॉन काढून घेतली त्याचवेळी अनिल उर्फ अनीमोल गोगाचज्या शिंदे तक्रारदार यांच्या कानातील दोन सोन्याच्या बाळ्या जबरदस्ती इसकावून तोडून घेतल्या व देवराज अमित शिंदे व शानू अमित शिंदे या दोघांनी तक्रारदार यांच्या खिशातील मोबाईल देखील काढून घेतले तक्रारदार यांचा मित्र ऋषिकेश यांच्या देखील खिशातील मोबाईल सुषमा सुविचार शिंदे व मीना लाहूर शिंदे या दोघींनी जबरदस्तीने काढून घेतला. त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झाल्यानंतर पुसेगाव पोलिसांनी कसून तपास करून त्यांना शतापीने पकडून त्यांच्या जवळील दरोड्यातील अंदाजे सुमारे तीन लाख 82 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना केले गजा आड.
Comments
Post a Comment