जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम ग्रुप फलटण यांच्या वतीने फादर्स डे कार्यक्रम उत्साहात संपन्न.

जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम ग्रुप फलटण यांच्या वतीने फादर्स डे कार्यक्रम उत्साहात संपन्न.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

जैन सोशल ग्रुप संगिनी फोरम युवा फोरम फलटण या तिन्ही ग्रुप तर्फे फादर्स डे कार्यक्रम 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.प.पु.आचार्य शांतीसागर महाराज पाठशाळे तील विद्यार्थ्यांनी JSGian सौ.पुजाभाभी भुता यांचे मार्गदर्शना खाली नृत्य ,नाटीका व कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच सकल जैन समाजातील लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन कविता एकांकिका डान्स सादरीकरण केले
उपस्थित पिताश्री चे मुलांनी पादप्रक्षालन  केले. त्याचबरोबर हॅप्पी फादर्स डे पिन लावून त्यांचा सन्मान करण्यात आला पिता व मुलांच्या विवीध गेम्स घेण्यात आल्या व गिफ्ट देण्यात आले.उपस्थित श्रावक - श्राविका,पिताश्री नी फादर्स डे कार्यक्रम आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.संगिनी सचिव सौ.वृषाली गांधी यांनी उत्कृष्ट असे सुत्र संचालन केले .कार्यक्रमाची सुरुवात उत्कर्षा गांधी यांनी सुंदर आवाजात मंगलाचरण म्हणत केली त्याचबरोबर JSG सचिव सौ.निना कोठारी यांनी प्रास्ताविक केले‌. संगिनी सहसचिव व जेएसजी संचालक मनीषा घडिया यांनी फेडरेशन सूत्र वाचन केले
कार्यक्रमास महाराष्ट्र रिजनचे फलटण पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर फलटण ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता व डॉक्टर अशोक व्होरा ,मंगेश भाई दोशी त्याचबरोबर जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्रीपाल जैन संगिनी फोरम अध्यक्ष मनीषा व्होरा हेही उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांचाJSG अध्यक्ष व संगिनी अध्यक्ष यांचे हस्ते ऊचित सत्कार करण्यात आला.
संगिनी फोरम 
अध्यक्ष- मनीषा व्होरा
 सचिव- वृशाली गांधी 
खजिनदार -विनयश्री दोशी

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.