कामगार दिनानिमित्त कामगारांनाजैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम फलटण यांच्या वतीनी पुष्पगुछ व सोलापुरी चादर देऊन सन्मान कार्यक्रम उत्साहात सपंन्न.
कामगार दिनानिमित्त कामगारांनाजैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम फलटण यांच्या वतीनी पुष्पगुछ व सोलापुरी चादर देऊन सन्मान कार्यक्रम उत्साहात सपंन्न.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
हो तो कामगार पळतो काम करतो म्हणूनच आपला समाज स्वच्छ आणि निर्मळ दिसतो शाळा असतील किंवा कोणतेही सामाजिक ठिकाण असेल
किंवा आपल्या अगदी घरी काम करणारे मावशी दादा असतील अशा या कामगारांसाठी जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम फलटण ने एक उपक्रम राबवला
1 में 2025 वार गुरुवार सकाळी 7.15
मधुजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे कामगार दिनानिमित्त सकाळी सव्वा सात वाजता झेंडावंदन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश बबनराव शिंदे तसेच बाल मंदिर च्या मुख्याध्यापक राजपूत मॅडम शेख मॅडम समवेत बाकी शिक्षक ही उपस्थित होते यावेळी संगिनी फोरमच्या अध्यक्षा मनीषा व्होरा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला , माजी अध्यक्ष अपर्णा जैन ही उपस्थित होत्या
त्यानंतर शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिपाई महिला कामगार तसेच साफ सफाई करणारे कामगार व वाचमेन दादा यांना संगिनी फोरम च्या वतीने
मोतीमाळा, गुलाबाचे ,फुल, श्रीफळ व सोलापुरी चादर देऊन सन्मान करण्यात आला.आजच्या या सन्मानासाठी संगिनी फोरमच्या अध्यक्षा मनीषा व्होरा यांनी सोलापुरी चादर भेट दिल्या.तसेच शाळेला गोष्टींच्या पुस्तकांचा सेट भेट देऊन हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडला त्यानंतर बालमंदिरच्या मुख्याध्यापिका राजपूत मॅडमने आम्हाला बोलवून सर्वांसोबत आईस्क्रीमचा आनंदही घेतला
शाळा फिरून पाहिली व इथून पुढेही काही सेवा आम्ही शाळेसाठी करू शकलो तर निश्चित करू असे सांगणे अध्यक्षा मनीषा व्होरांनी शाळेत करून आजचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी कामगार यांच्या वतीने देखील अध्यक्ष- मनीषा व्होरा सचिव -वृषाली गांधी
खजिनदार- विनयश्री दोशी संगिनी फोरम सर्व पदाधिकारी फलटण यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment