जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रीजन अंतर्गतसंगिनी फोरम फलटण यांच्या वतीने पंचायत समिती फलटण येथे केले वृक्षारोपण.
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रीजन अंतर्गतसंगिनी फोरम फलटण यांच्या वतीने पंचायत समिती फलटण येथे केले वृक्षारोपण.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
शरदभई स्मृती सप्ताह दिनानिमित्त संगिनी फोरम फलटण ने पंचायत समिती फलटण येथे भव्य वृक्षारोपण🌱🌱🌱 केले,, या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार साहेब ,उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा भुजबळ साहेब, तसेच पंचायत समिती सर्व विभागातील सर्व अधिकारी ,कर्मचारी, यांच्या समवेत जैन सोशल ग्रुप मार्स योगा व सूर्यनमस्कार कन्वेनयर सविता दोशी ,जैन सोशल ग्रुप फलटण सचिव निना कोठारी, तसेच संगिनी फोरम फलटण अध्यक्ष मनीषा व्होरा उपस्थित होते.. या
कार्यक्रमास उपस्थित सर्व लोकांचे स्वागत संगिनी खजिनदार विनयश्री दोशी यांनी केले ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिनी फोरम सचिव वृषाली गांधी यांनी केले ..या कार्यक्रमास योगा कन्वेनयर सविता बेन यांनी शुभेच्छा दिल्या ,त्याचबरोबर मनीषा व्होरा यांनी आपल्या संगिनी फोरम चे कार्य कशाप्रकारे चालते याबद्दलची माहिती सर्वांना दिली ,त्याचबरोबर उपअभियंता भुजबळ साहेब यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत आपल्या या कार्याचे कौतुक केले आणि अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले गटविकास अधिकारी सतीश कुंभार सरांनी आपल्या कार्याचे कौतुक करत आपल्याला शुभेच्छा देत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बीज संकलन साठी आपल्या जैन समाजालाही बी संकलनास आव्हान दिले व कार्यक्रमास आपल्याला सहभागी होण्यास सांगितले.. रोपे लावणे संदर्भात कृषी अधिकारी फरतडे साहेब, विस्तार अधिकारी आप्पासाहेब गौंड यांनी खूप छान मार्गदर्शन केले आणि याचमुळे सुंदर अशी 101 रोपे संगिनी फोरम कडून लावण्यात आली, या कार्यक्रमात उपस्थित संगिनी मनीषा घडिया, राजश्री महाजन, नीलम डुडू, नेहा दोशी, शिल्पा दोशी, यांनीही रोपे लावली , कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगिनी माझी अध्यक्षा व जैन सोशल ग्रुप सचिव नीना कोठारी यांनी केले या कार्यक्रमास सातारा 24 तास न्यूज चे राजेंद्र मदने पत्रकार उपस्थित होते ,,(रोपे श्रीकृष्ण नर्सरी)यांचे देखील अध्यक्ष -मनीषा व्होरा
सचिव- वृषाली गांधी खजिनदार- विनयश्री दोशी आभार मानले.
Comments
Post a Comment