मुंबई झोपडपट्टी धारकांसाठी प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहिती सक्रिय.

मुंबई झोपडपट्टी धारकांसाठी प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहिती सक्रिय.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अर्ज व तक्रारींचे निवारण करणाऱ्या विविध स्वयंचलन प्रणालींचे उदघाटन तथा संबंधित पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबईतील नागरिक / झोपडपट्टी धारकांसाठी, प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहितीचे सक्रिय प्रकटीकरण (Proactive Disclosure) करून, एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
विविध स्वयंचलन प्रणालींचे विवरण :
✅ वारस प्रमाणपत्र स्वयंचलन प्रणाली
      (Online Legal Heir Application)
✅ जमिन भूसंपादन सुसूत्रीकरण प्रणाली
      (Online land Acquisition Process Application)
✅ भूखंड अधिमूल्याबाबत मुदतवाढ पर्याय प्रणाली
       (Online Deferment land Premium Application)
✅ पत्रव्यवहार नोंद व तक्रार व्यवस्थापन प्रणाली
       (Letter Tracking with Grievance Management)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संकेतस्थळावरच्या माहितीच्या प्रकटीकरणाचे विवरण :
✅ भूसंपादन आदेश
✅ परिपत्रक 144 व 144 A नाहरकत प्रमाणपत्र
✅ वारस आदेश
✅ कलम 33 (निष्कासन) आदेश
✅ कलम 33 अ आदेश
✅ कलम 33/38 (निष्कासन) आदेश
✅ परिशिष्ट - 2* PAP वाटप * OC/CC
✅ परिपत्रक 162 अ प्रमाणे पुनर्वसन सदनिका वाटप पत्र यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. संतोष बांगर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.