डॉक्टर ममदापुर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखत निधन.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
डॉक्टर सुरेश ममदापूर 74 यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभो ही प्रार्थना त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वराने शक्ती द्यावी व त्यांच्यावर मायेची पांघरून घालावे ही प्रार्थना डॉक्टर सुरेश तमन्ना राव ममदापूर हे विद्यानगर कोरेगाव तालुका कोरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी बरेच वर्षे त्यांनी कोरेगावात वैद्यकीय व्यवसायात घालवली त्यांच्या सौभाग्यवती कोरेगाव येथे ग्रामीण रुग्णालयाला मुख्य डॉक्टर म्हणून होते कोरेगाव तालुक्यात यांचे वास्तव्य व विद्यानगर मध्ये त्यांचे निवास होते नुकतेच ते पुणे येथे वास्तव्यास गेले होते त्यांच्या पाठीमागे त्यांचा संदीप मुलगा पुणे येथे वास्तव्यास आहे कोरेगाव मध्ये डॉक्टरांनी व त्यांच्या सहभागी होतील विद्यानगर शिवाजीनगर सज्जनपुरा कोरगाव तालुका व कोरेगाव शहर या परिसरात एक मायेचा ओलावा निर्माण केला होता त्यांना मानणारा त्यांच्या आपुलकीची जाणीव असणारा त्यांचा चाहता मोठा वर्ग समाजातील सर्व स्तरात आहे या बातमीमुळे त्यांच्या परिचित व्यावसायिक सर्व दुःखी झालेच कोरेगाव शहराच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली पाहण्यात आली.
Comments
Post a Comment