जैन सोशल ग्रुप फलटण हा सर्व समाजाबरोबर जोडला गेला आहे.
फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट.
फलटण ः जैन सोशल ग्रुप फलटण हा केवळ जैन समाजापुरताच मर्यादित नसून इतरही समाजाबरोबर जोडला गेलेला आहे. त्यांची सर्व समाजाप्रती काम करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. फलटणच्या तिन्हीही ग्रुपचे काम एकदम शिस्तबद्ध असून रिर्पोटींग बाबत नेहमीच अव्वलस्थानी राहिला आहे. त्यामुळेच या ग्रुपने केवळ रिजन लेव्हल नव्हे तर फेडरेशन लेव्हलपर्यत अॅवॉर्डस् घेतली आहे. अशा या ग्रुपच्या पदग्रहण समारंभास येण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे मत जेएसजी इंटरनॅशनल प्रेसिटेंट बिनेरभई शहा यांनी व्यक्त केले.
जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम,फलटणच्या सन 2025-2027 सालातील अयोध्या एसी बॅक्वेट हॉल,फलटण येथे आयोजित केलेल्या पदग्रहण समारंभाप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र रिजनचे चेअरमन व शपथदाते दिलीपभई मेहता, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, कोल्हापूर झोन को-ऑर्डिनेटर सौ.रज्जुबेन कटारिया, संगिनी फोरम महाराष्ट्र रिजन चेअरपर्सन नमिताबेन शहा, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, महिला सक्षमीकरण कमिटी कन्व्हेनर सौ.स्मिता शहा, व्यसनमुक्ती कमिटी कन्व्हेनर डाॅ.सूर्यकांत दोशी, योगा, मेडीटेशन कमिटी कन्व्हेनर सौ.सविता दोशी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बिरेनभई शहा म्हणाले, फलटण ग्रुप आणि माझा गेल्या चार-पाच वर्षापासून अगदी जवळचा संबंध आला आहे. फलटण ग्रुपला जेव्हापासून ओळखतो तसा तो लिडर्सचा ग्रुप असल्याचे मी मानतो. आधी झालेले अध्यक्षांनी त्यांच्या काळात चांगले काम केले, जे आत्ता झाले आहेत त्यांचीही काम करण्याची क्षमता चांगली आहे व जे पुढे काम करणार आहेत त्यांच्यातही समाजाप्रती काम करण्याची जिद्द व लिडर्सची क्वालिटी नक्कीच दिसत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून बी2बी सिस्टीम राबविण्यात येणार आहे. जैन समाजाचा डेटाबेस तयार करण्याचे काम चालू आहे. या माध्यमातून व्यवसायासंबंधी मदत, नव वधुवरां साठी मॅट्रीमोनिअल वेबसाईट व जैन समाजातील मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासंबंधीचे प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यासाठी जैन बांधवांनी आपली नोंदणी दिलेल्या फॉर्म मध्ये न चुकता भरुन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी बोलताना
महाराष्ट्र रिजनमध्ये फलटणचे तिन्हीही ग्रुप अत्यंत आगळे वेगळे आहेत. जैन सोशल ग्रुप फलटण हा ग्रुप फक्त जैन समाजपुरताच मर्यादित नसून इतर समाजाबाबतीही संवेदनशील आहे. त्यांनी फलटणमध्ये राबविलेले उपक्रम हे नेहमीच आदर्श ठरले आहेत कारण त्यांचे उपक्रम हे समाजशील असतात. येथील पत्रकारांनीही जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमांना नेहमीच साथ देऊन प्रसिद्धी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
शपथदाते दिलीपभई शहा यांनी जैन सोशल ग्रुपचे नूतन अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ.निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा, सचिव सौ.वृषाली गांधी, खजिनदार सौ.विनयश्री दोशी, युवा फोरमचे अध्यक्ष श्री.पुनित दोशी, सचिव सिद्धेश शहा, खजिनदार मिहीर गांधी तसेच त्यांच्या समवेत असणार्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळास त्यांच्या पदाची जबाबदारी सांगून शपथ दिली.
व तहानलेल्याला ना पाणी देणे हे प्रमुख कार्य पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे असे आवाहन करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
जैन सोशल ग्रुपचे नूतन अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ही माझ्या जीवनातील एक सामाजिक यात्रेची सुरुवात आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला बहुमुल्य आहे. अध्यक्ष पदावरुन काम करताना फेडरेशन-रिजनने सुचवलेले उपक्रम तसेच वृद्धाश्रम, मूकबधिर शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी उपक्रम राबविणार असून महिलांसाठी आरोग्य शिबीरे, तरुणांसाठी स्कील डेव्हलपींग प्रोग्राम तसेच शेतकरी बांधवांमध्ये जैविक शेतीविषयक जागरुकता अभियान यावर भर दिला जाणार आहे. अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल श्रीपाल जैन यांनी सर्वांचे आभार मानले.
संगिनी फोरम अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा व युवा फोरम अध्यक्ष श्री.पुनित दोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष व सचिव यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर करून नूतन अध्यक्ष, सचिव व खजिनदार सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात सामुहीक णमोकार मंत्र पठणाने करण्यात आली. डॉ.कु. मनाली गांधी यांनी उत्कृष्ठ नृत्य करून मंगलाचरण सादर केले. तुषार शहा यांनी फेडरेशन सूत्र वाचन केले नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मावळते सचिव प्रितम शहा यांनी केले. यावेळी महाराष्ट्र रिजनकडून बेस्ट प्रेसिडेंट अॅवॉर्ड मिळविलेल्या सौ.सविता दोशी, सौ.अपर्णा जैन व युवा फोरम बेस्ट सचिव अॅवॉर्ड विजेते पुनीत दोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच नव्याने सदस्य झालेल्या तिन्हीही ग्रुपच्या सदस्यांचा शपथ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कु.मनाली गांधी व तुषार शहा यांनी तर आभार प्रदर्शन ओंकार शहा यांनी केले.
कार्यक्रमास जैन सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी,तिनी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment