तंत्रज्ञानाची कास धरत समतोल विकास साधणार्या महाराष्ट्राची विकासगाथा.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे आयोजित 'इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट 25 : लिडिंग द लिप' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यापासून ते ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या आपल्या दृष्टिकोनापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. यासोबतच फिनटेक, एआय तसेच स्टार्टअप इकोसिस्टीममार्फत इनोव्हेशन व उद्योगांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रात देखील एआयच्या मदतीने विविध उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.राज्य सरकारने दावोस येथे केलेल्या सामंजस्य करारांमधील 85% करार हे मार्गी लागत असून उर्वरित 20% करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासाठी उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा, जमीन तसेच परवाने देण्याचे काम राज्य शासन वेगाने करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीए आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख संस्थांमध्ये ₹4,07,000 कोटींचे तर महाराष्ट्र शासन आणि मॅग्नम आईस्क्रीम कंपनी होल्डको नेदरलँड्स बी.व्ही. (युनिलिव्हर)मध्ये ₹900 कोटींचे (1000 रोजगार निर्माण करणारे) सामंजस्य करार देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक व अध्यक्ष मनोज लढवा, द मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे ग्लोबल सीएफओ अभिजित भट्टाचार्य, मॅग्नम आईस्क्रीम कंपनी इंडिया बिझनेसचे सीईओ टोलॉय तानरीदागली आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment