रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जी. प. शाळा कोरेगाव येथील विध्यार्थ्यांना शैक्षणीय वस्तूचे वाटप.

रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने 
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जी. प. शाळा कोरेगाव येथील विध्यार्थ्यांना शैक्षणीय वस्तूचे वाटप.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

आज दिनांक ११ एप्रिल २०२५ या रोजी रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व परिवर्तन विचारमंच  कोरेगाव तालुक्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव शहरांमधील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक वाटप करण्यात आले. ते पुढीप्रमाणे  जिल्हा प्राथमिक शाळा  कोरेगाव नंबर १. २ व   जिल्हा प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर तसेच जिल्हा प्राथमिक शाळा सुभाष नगर कोरेगाव त्यानंतर कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी सर्व जिल्हा प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना महापुरुषांनबद्दल व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले,   बोतालजी यांनी विद्यार्थ्यांना असे सांगितले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” व कोणत्याच ठिकाणी आपल्याला कसलीच भीती वाटणार नाही, त्यामुळे शिक्षण घेणे खूप काळाजी गरज आहे, असे 
बोतालजी यांनी मनोगत व्यक्त केले, त्यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस वनिता खवळे, तालुका युवक अध्यक्ष ऋतुराज वायदंडे, तालुका कार्याध्यक्ष दीपक खरात, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शौकत कुरेशी, कार्याध्यक्ष मनीषा खरात, कविता वाघमारे, सनी खरात, शिरीष आवळे,  आमचे    सहकारी मित्र आदेश पाटील इत्यादी उपस्थित होते, त्यांनतर महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष मनीषाताई सोनवणे यांनी ४ जिल्हा प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षकांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.