फलटण येथे भगवान महावीर यांची 2623 वी जयंती उत्साहात संपन्न.

फलटण येथे भगवान महावीर यांची 2623 वी जयंती उत्साहात संपन्न.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण दि.10/4/2025 रोजी भगवान महावीर जयंती उत्साहात सपंन्न झाली. भगवान महावीर यांनी अहिंसाचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारी जैन धर्माची 24 वे तीर्थकार होते. भगवान महावीर यांचा जन्म कुंडलग्राम वैशाली बिहार येथे सन पूर्व 599 मध्ये झाला. त्यांनी अहिंसा सत्य असतेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही पंचमहावृत्ते शिकवली. भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते पण त्यांनी जैन धर्माला प्रभावशाली बनवले. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24 तीर्थकार होते. भगवान महावीर यांनी कठोर बारा वर्षे तपश्चर्या केली. नंतर संपूर्ण भारतात ब्रह्मण केले या काळात आपली शिकवण दिली. जगातील दुःखाचा अभ्यास केला यातून लोकांना बाहेर येण्याचा मार्ग दाखवला म्हणूनच फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भगवान महावीर यांची जयंती उत्सव साजरी करण्यात येते. या जयंतीनिमित्त ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून भगवान महावीर यांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.