मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील प्रभागांचा पाहनी दौरा सुरु.

मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील प्रभागांचा पाहनी दौरा सुरु.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे माध्यमातून एकत्र फलटण शहरातील प्रभागांचा पहानी दौरा आजपासून सुरू करण्यात आला आहे मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांनी नुकतेच प्रत्येक प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर केले आहेत. यातील प्रत्येक प्रभागासाठी दिलेले 50 लाख रुपयांचे प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी जसे की गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण करणे या साठी खर्च करावयाचे आहेत अशा सूचना मा. खासदार व आमदार यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आज सोमवार पेठ प्रभाग क्रमांक एक मधून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे त्यावेळी दौऱ्यात उपस्थित गटनेते श्री अशोकराव जाधव, पश्चिम मंडल अध्यक्ष श्री अमोल सस्ते, श्री रणजितबाबा भोसले,नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्री राहूल निंबाळकर, श्री देवा पाटिल, प्रसाद पाटील, संजय गायकवाड, उमेश पवार, आर डी, अमित भोईटे, अमोल भोईटे, सनी मांढरे, राजू निंबाळकर, महेश घाडगे, अमोल घाडगे, संदीप घाडगे, सुनिल घोलप, संग्राम सावंत, रमेश जाधव, संदिप जाधव , लतिफभाई तांबोळी व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.