मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भरती प्रादेशिक कार्यालयाची महासंचालक डॉ. डी. जे. पांडियन व शिष्टमंडळ यांच्यात सखारात्मक चर्चा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भरती प्रादेशिक कार्यालयाची महासंचालक डॉ. डी. जे. पांडियन व शिष्टमंडळ यांच्यात सखारात्मक चर्चा.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक डॉ. डी.जे. पांडियन आणि त्यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बँकेच्या शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.महाराष्ट्राला 1 हजार अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची आहे. यासाठी राज्यात गतिमान दळणवळणाची तसेच शैक्षणिक व भौतिक दृष्ट्या सक्षम शिक्षण व्यवस्था उभी करावी लागणार आहे. याकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक राज्याला भरघोस आर्थिक मदत देईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.नवीन शैक्षणिक धोरण राज्याने अवलंबिले असून, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास करण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी उन्नत होऊन राज्याच्या वेगवान विकासात योगदान देतील. शाळांचा विकास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्त्यांची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण गतिमान करण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 'सीएम श्री इन्स्टिट्यूशन' हा शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजना आणि ग्रामविकास विभाग राज्यात ग्रामीण भागात सिमेंट काँक्रीट रस्ते विकास प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
यावेळी पब्लिक सेक्टर विभागाचे महासंचालक, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
Comments
Post a Comment