स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नाही: गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते.

स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नाही:  गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
 
निढळ ता .खटाव येथील जिल्हा परिषद शाळा  स्पर्धेच्या युगात कुठेही कमी नाही .या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते .वेगवेगळे उपक्रम राबवले जातात .त्यामुळे सरकारी शाळा या स्पर्धेच्या युगात टिकून आहेत निढळ ता खटाव येथे जिल्हा परिषद  स्पर्धेच्या युगातीलशाळा यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते बोलत होत्या . यावेळी चिमुकल्यांनी अनेक नृत्य आविष्कार सादर केले. मुला मध्ये व पालकां मध्ये प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला.यावेळी ग्रामस्थांनी अनेक रुपयांची बक्षिसे चिमुकल्याना दिली . गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते ,विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्र प्रमुख संजय दीडके,गणेश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक दीपक भुजबळ,राऊत सर,देसाई सर,जगताप सर,पवार सर ,कोरडे मॅडम ,बनकर मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती  यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले . यावेळी ग्रामस्थ  व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्र संचालन हनुमान विद्यालय निढळ चे पर्यवेक्षक कांबळे एस एन सर यांनी केले .आभार संतोष खुस्पे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.