मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी मुंबई येथे परिवहन आयुक्त कार्यालय इमारतीचे केले भूमिपूजन.
औंध प्रतिनिधी, नवनाथ देशमुख.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी, मुंबई येथे परिवहन आयुक्त कार्यालय 'परिवहन भवन' इमारतीचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी २ संपर्करहीत (फेसलेस) सेवांचे लोकार्पण केले. आधारक्रमांकाचा वापर करून या सेवांचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
✅हायपोथिकेशन टर्मिनेशन - वाहनावरील कर्जाचा बोजा उतरवणे
✅डीलर पॉईंट रजिस्ट्रेशन फॉर फुल्ली बिल्ट व्हेईकल - पूर्णपणे बांधणी केलेल्या हलके व्यावसायिक वाहन वितरकाद्वारे नोंदणी करणे
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. मनीषा कायंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment