जुगार चक्री दारूविक्री करणाऱ्या गुन्हेगारांना पुसेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैद्य जुगार, चक्री व दारू विक्री करणाऱ्या इसमानची माहिती काढून पुसेगाव पोलीस स्टेशन ने कडक कारवाई करून इसमांना घेतले ताब्यात पुसेगाव गावातील सातारा पंढरपूर रोड लगत असलेले पत्रा शेडमध्ये तसेच हॉटेल राधेयचे समोरील मोकळ्या जागेत अवैद्य जुगार ,चक्री चालवीत असताना मिळून आलेल्या अनिल रामचंद्र जाधव. पुसेगाव ,ता खटाव .व आयुब चांद मुलानी राहणार पुसेगाव या दोघांना परिणामक व दर्जेदारछापा टाकून त्यांच्याकडून 14,802 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे खटाव बीट कार्यक्षेत्रातील मौजे दरूज ,ता. खटाव जिल्हा सातारा येथील अवैध दारू धंदे करणाऱ्या सुरेश एकनाथ गायकवाड, सचिन मधुकर पाटोळे ,श्रीमती मीराताई संतोष कंजारभाट सर्व राहणार दरूज .ता. खटाव जिल्हा सातारा अशा तीन व्यक्तींवर छापे टाकून त्यांच्याकडून 2,10O रूपये किमतीचे 5 लिटर 410 मिली दारू जप्त केली आहे अवैद्य जुगार चक्री व दारू विक्री करणाऱ्या या इसमांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली असून पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या करणाऱ्यांना वेळेतच छापे टाकून कारवाई करणार असल्याबाबतचे श्री संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव. यांनी सांगितले असून ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर ,कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले ,सहाय्यक फौजदार श्री सुधाकर भोसले, दीपक बर्गे ,पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, द-याबा नरळे ,यांची सदरची कारवाई केली आहे या कारवाईत पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment