पत्रकार ते गोसेवा करणारे आदर्श व्यक्तिमत्व :-पंकज कदम.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
विसापूर परिसरातील गेले गेले वीस वर्षापासून विविध दैनिकांमधून पत्रकारिता करीत अनेक युवकांना योग्य मार्गदर्शन व व्यसनापासून दूर होण्याचे फायदे व हिंदू धर्म जनजागृती साठी युवकांना मार्गदर्शन गोसेवेचे फायदे याची माहिती देत गेल्या तीन वर्षापासून त्यांनी खिलार गाई (गोशाळा )सुरू करून गोशाळेत वीस गाई व चार नंदी आहेत त्यांनी त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले असून या गोशाळेसाठी आमदार महेश शिंदे यांची ही भक्कम साथ असल्याचे त्यांनी सांगितले तर पुसेगाव, खातगुण, विसापूर या परिसरतील ग्रामस्थ गोशाळेत चारा उपलब्ध करून देत आहेत तर पत्रकारिता क्षेत्रामधून सुद्धा त्यांनी आपल्या लेखनातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे तर रस्ते अपघातामध्ये अनेक लोकांना सहकार्य केले आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना वेळोवेळी उपचार मिळवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे समाजासाठी नेहमी कार्यरत आहेत तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री आ. महेशदादा शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेतकरी आणि युवा मित्रांना नेहमीच मार्गदर्शन करणारा हाडाचा पत्रकार श्री पंकज कदम (दादा )यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा
युवा नेते हरिश्चंद्र सावंत.(चाचा ) विसापूर
Comments
Post a Comment