पाडेगाव येथे कृषीदुतांनी दिले रांगोळी व प्रतिकृतीच्या माध्यमातून संपूर्ण गावचे दर्शन.
सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांनी ग्रामस्थांना रांगोळी आणि विविध प्रतिकृती चा माध्यमातून ग्रामीण दर्शन चे प्रात्यक्षिक दिले.
कृषिदूतांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पाडेगाव येथे रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवले, या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रांगोळीतून कृषिदूतांनी गावातील शेती, ग्रामपंचायत, रस्ते, निरा नदी,कालवा,नर्सरी,मंदिरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केंद्र, समता माध्यमिक विद्यालय,जिल्हा परिषद शाळा,किराणा दुकान अशा अनेक गोष्टी दाखविल्या. त्या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, प्रा.डॉ.धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत इंगोले धनंजय, काटकर सौरभ, कांबळे रोहन, केसकर राहुल, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत व गोडसे आदित्य यांनी हा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment