अनोळखी इसमास ओळखत असाल तर पुसेगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी मंदिर परिसरातून एक इसम उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे 108 नंबर ॲम्बुलन्स मधून ऍडमिट केले होते सिव्हील हॉस्पिटल मधून सातारा येथून पुढील उपचारा कामे ससून हॉस्पिटल पुणे येथे नेले असता उपचारादरम्यान त्या इसमाचे मयत झाले असून या इसमाचे अंदाजे वय 58 वर्ष उंची अंदाजे पाच फूट तीन इंच ,रंग सावळा, डोक्यावरील समोरील बाजूचे टक्कल पडलेला व केस काळे पांढरे, मिशी बारीक ठेवलेली व मिशीला काळे पांढरे केस ,शरीरा बांधा मध्यम ,नाक सरळ, अंगामध्ये काळपट मळकट रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट आहे व इतर माहितीची कागदपत्रे बंद गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर कलम 194 प्रमाणे दाखल होऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून सातारा शहर पोलीस स्टेशन वरून सदर मयताची कागदपत्रे पुढील तपासा कामी पुसेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून सदर मयत व्यक्तीचा पुढील तपास पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण करीत असून या इसमास कोणी ओळखत असेल तर पुसेगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक O23 75 26 0 233 या क्रमांकावर किंवा मोबाईल नंबर 91 75 13 26 0 6 यावर कळविण्यात पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमण यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment