शून्य ऊर्जेवर आधारित शीतगृहाचे रावडी बु. प्रात्यक्षिक.

शून्य ऊर्जेवर आधारित शीतगृहाचे रावडी बु. प्रात्यक्षिक.

सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५" कार्यक्रमा अंतर्गत शून्य ऊर्जेवर आधारित शीतगृहाचे प्रात्यक्षिक सादर झाले.हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी अशोक बोबडे यांच्या शेडमध्ये पार पाडले. प्रात्यक्षिकादरम्यान कृषिदुतांनी शेतकऱ्यांना शीतगृहाची बांधणी व त्याचे उपयोग याची माहिती शेतकऱ्यांना दिली. सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून हे शीतगृह तयार करता येत असल्यामुळे शीतगृहाच्या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचे यशस्वी आयोजन कृषीदुत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, शेंडगे सार्थक  यांच्याकडून करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू डी चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.