रणसिंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भरला बाल बाजार खरेदीसाठी महिलांची झाली गर्दी.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
रणसिंगवाडी ता .खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवड्याचा बाल बाजार शाळेच्या आवारात शनिवारी अकरा रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत भरवण्यात आला या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला विकून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले.
या बाल बाजारामध्ये शाळेतील किलबिला होती, भाजीपाला स्वस्त फक्त एक दिवस, भाजी घ्या भाजी ताजी भाजी, चवीने खाणार त्याला आम्ही देणार, अशा आरोळ्या ऐकू येत होत्या तर बाजाराला महिलांचा मोठ्या प्रतिसाद मिळाला या बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे व सरपंच सुखदेव रणसिंग ,माजी उपसरपंच अविनाश रणसिंग, शाळा व्यवस्थापक अध्यक्ष बापूराव बागल, पोलीस पाटील सुनील रणसिंग, तंटामुक्त अध्यक्ष सोमनाथ फडतरे, ह. भ. प. रणसिंग महाराज ,उपसरपंच विठ्ठल मसुगडे ,अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते करण्यात आले ,सर्व ग्रामस्थांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला विद्यार्थ्यांनी विविध भाज्या, फळे ,खाद्यपदार्थ कडधान्य आदी विविध प्रकारचे फळे विक्रीसाठी आणली होती तर हा बाजार बाल बाजार यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत गिरी , अजित गायकवाड, सर शिक्षिका शोभा शिरतोडे ,रीना मंडले यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment