फलटण कृषी महाविद्यालयातील कृषिदूतानी दिली पाडेगाव येथे लघुउद्योगांना भेट.

फलटण कृषी महाविद्यालयातील कृषिदूतानी दिली पाडेगाव येथे लघुउद्योगांना भेट.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी 'ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25° कार्यक्रमांतर्गत दिली लघुउद्योगांना भेट. कृषिदुतांनी गावातली विविध लघुउद्योगांचा जसे की शेवया निर्मिती, पापड निर्मिती, पिठाच्या गिरणी, तेल घाणा व मिरची डंक यांचा अभ्यास केला, त्यांची कार्यपद्धती, भांडवल, क्षमता व उत्पादन यांचा अभ्यास केला. यासाठी उद्योजक  ऋषिकेश कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत इंगोले धनंजय, काटकर सौरभ, कांबळे रोहन, केसकर  राहुल, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत व गोडसे आदित्य यांनी हा उपक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.