पडेगाव येथील शेतकऱ्यांची कृषीदुतान सोबत फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट.

पडेगाव येथील शेतकऱ्यांची कृषीदुतान सोबत फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट.

सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

पाडेगाव ता.खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतां सोबत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी फलटण येथील कृषी प्रदर्शनास भेट दिली.फलटण येथे दि.२ जाने. ते ६ जाने. दरम्यान श्रीमंत मालोजीराजे भव्य कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.तसेच नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती प्रदर्शनात एकाच ठिकाणी मिळाली. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चा सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते, त्या मध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषि उद्योजकता विकास, दुग्ध व्यवसाय आदी विषयी माहिती घेतली.तरी पाडेगाव येथील आधुनिक व प्रगतशील शेतकऱ्यांनी कृषीदुतांन सोबत या प्रदर्शनाचा लाभ घेतला.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा.नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत इंगोले धनंजय, काटकर सौरभ, कांबळे रोहन, केसकर  राहुल, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत व गोडसे आदित्य यांनी हा उपक्रम राबविला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.