महावीर मतिमंद विद्यालयात लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संक्रातीचे औचित्य साधून मुलांना तिळगूळ व खाऊ चे वाटप.
महावीर मतिमंद विद्यालयात लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संक्रातीचे औचित्य साधून मुलांना तिळगूळ व खाऊ चे वाटप.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
लावण्य स्विहा संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या जिजाऊ पुरस्कार यामार्फत मिळालेल्या निधीमधून विद्यार्थ्यांना मकर संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ व खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी मुलांना लावण्यस्विहा संस्थेच्या वतीने सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव मिलिंद लोहार यांनी संस्थेची वाटचाल आपल्या शब्दात व्यक्त केली तसेच वरिष्ठ उपाध्यक्षा मिलिंदा पवार यांनी संक्रांतीचा गोडवा खरा मुलांमधे च आहे हे खाऊ देताना सांगितले त्याचबरोबर संध्या नारायनकर यांनी पण संस्था यापुढे देखील त्यांच्या परीने या मुलांसाठी कायम काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही सांगितले.संस्थेचे सहसचिव अक्षय वलठे व अध्यक्षा प्रियांका ढम यांची ही उपस्थिती होती तसेच संस्थेचे विश्वस्त हेमलता ढम , मारुती लोहार , व जयश्री लोहार , तसेच सभासद अपर्णा लोहार याही उपस्थित होत्या व या सर्व मूलांच्या चेहऱ्यावरील आनंदी पाहून सर्व भारावून गेले . शाळेतील शिक्षक खूपच चांगले काम करत आहेत व त्यांचे कौतूक केलेच पाहिजे अशाप्रकारे लावण्य स्विहा च्या सर्व सभासदांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment