पुसेगाव येथे मंगळवारी रस्ता रोको व पुसेगाव बंदची हाक.
पुसेगाव प्रतिनिधी.पंकज कदम.
पुसेगाव ता, खटाव .जि. सातारा ,येथील श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र पुसेगाव सातारा लातूर रस्त्याच्या रखडलेल्या कामा शेजारील संबंधित मालमत्तेची त्वरित मोजणी करून मिळण्याबाबत आणि तत्काळ काम सुरू व्हावे यासाठी पुसेगाव मंगळवारी दिनांक 28. 1. 2025 रोजी बंद व सकाळी 11 वाजता रस्ता रोको करण्यात येणार आहे पुसेगाव हे तीर्थक्षेत्र असून लाखो भाविकांची श्रद्धास्थान व कांदा ,बटाटा, मोठी बाजारपेठ आहे व खते बी बियाणे विविध वस्तू घेण्यासाठी पुसेगाव परिसरातील अंदाजे 30 ते 40 गावातील व वाडी वस्तीवरील लोक या ठिकाणी रोज काही ना काही खरेदीसाठी ये जात करीत असतात. सातारा लातूर रस्त्या हा तीर्थक्षेत्र पुसेगाव मधील येरळा नदीपासून ते छत्रपती संभाजी चौक,व डॉक्टर सुरेश जाधव यांच्या दवाखान्यापर्यंत रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याबाबत यावे यासाठी जी मोजणीची अडचण सांगितली जाते ती मोजणी त्वरित करावी आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे व मागील सहा दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन याची दखल घेऊन उद्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगाव येथे उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी. उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज हे आंदोलन स्थळावर येईपर्यंत रस्ता रोको सुरू राहणार असल्याचे आंदोलनाचे संयोजक धीरज जाधव ,रणधीरशेठ जाधव, नितीन देशमुख ,राम जाधव, यांच्या निवेदनावर सह्या असून हे निवेदन ग्रामपंचायत पुसेगाव, पुसेगाव पोलीस स्टेशन ,उपअधीक्षक अभियंता कार्यालय वडूज, मेघा इंजिनियर कंपनी, महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ पुणे ,उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वडूज ,आमदार महेश शिंदे साहेब ,खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले ,यांनाही देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment