मुरूम येथे बोर्डो मिश्रण प्रात्यक्षिक .
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण दि.२५/१२/२०२४
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये बॉर्डो मिश्रण तयार कसे करावे व त्याचा वापर यावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन .
या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी बोरडो मिश्रण म्हणजे काय तसेच बोरडो मिश्रण पासून होणारे फायदे समझून सांगितले तसेच बोरडो मिश्रण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सामग्री सांगण्यात आली.तसेच कृषिदुतांनी बोरडो मिश्रण तयार करून त्याची फवारणी करून दाखवली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड व तेजस गाढवे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.
Comments
Post a Comment