रावडी बु. येथे कृषीदुतानी गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दिले.

रावडी बु. येथे कृषीदुतानी गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दिले.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

 फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमांतर्गत दिले शेतकऱ्यांना गांडुळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक. आजच्या काळात औद्योगिक, प्राणी, कृषी, नगरपालिका कचरा वाढत आहे आणि मृदेची कमी होत जाणारी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गांडूळ खत निर्मितीची गरज आहे. गांडूळ खत हे पूर्णपने नैसर्गिक असून सेंद्रिय आहे त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तसेच मृदा भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकांची योग्य वाढ होते, सूक्ष्मजीव व गांडुळांची हालचाल वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते, पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते, औद्योगिक व कृषी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते असे फायदे पटवून देण्यात आले. हा प्रकल्प प्रशांत शिंदे यांच्या फार्म वर घेतला त्या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, प्रा. संजय अडत सर तसेच मृदाशास्त्र व कृषी रसायन तज्ञ प्रा. जी एस शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत  जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, शेंडगे सार्थक यांनी हा उपक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.