सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त खामगाव जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
खामगाव, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूतांकडून ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत खामगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यध्यापिका - सौ.जयश्री दिवटे मॅडम उपशिक्षिका सौ.स्वाती गायकवाड मॅडम , उपशिक्षिका श्रीमती . छाया गायकवाड मॅडम, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने सुरवात करण्यात आली.कृषीदूतांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यानंतर उपशिक्षिका सौ. स्वाती गायकवाड मॅडम यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान व सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी विचारांवर मी सावित्राबाई फुले बोलतेय हा एकपात्री प्रयोग करून दाखविला .विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित भाषणे सादर केली ज्यामुळे उपस्थितांना प्रोत्साहन मिळाले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीदूत - पिसाळ रविकुमार , फरांदे संकेत , सकट उत्कर्ष , धायगुडे प्रणव, थोरात चरण , वडणे अथर्व, ठोंबरे सौरभ, तूपसौंदर ओंकार यांचे विशेष सहकार्य लाभले .
Comments
Post a Comment