सौ.स्वाती गायकवाड राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

सौ.स्वाती गायकवाड राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव ता.फलटण येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. स्वाती महेंद्र गायकवाड यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था अविष्कार फौंडेशन, इंडिया (कोल्हापूर, महाराष्ट्र )यांचे मार्फत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिला जाणारा सन 2025 चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार नुकताच शिरवळ येथे प्रदान करण्यात आला.
केनिया येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुवर्णपदक विजेता  धावपटू मा. श्री केनिथ कीर्तीजी, माजी उपकोषागार अधिकारी, मा. श्री जयकुमार  खरात, यशदा ट्रेनर मा.श्री विवेक गुरव तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
लोकसहभागातून शाळेचा कायापालट करणे, क्रीडा क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडवणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणे यात त्यांचा हातखंडा आहे. 
त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अविष्कार फौंडेशन, कोल्हापूर यांनी त्यांना शिरवळ येथे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केले.
स्वाती गायकवाड त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी, शिक्षक सहकारी, पालक, खामगाव गावचे ग्रामस्थ, त्यांच्या मित्र-मैत्रिणी व शाळेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देतात.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.