फलटण येथील नाना पाटील चौकातील शिव रेसिडेन्सी लॉज येथे एक अज्ञात विसम बेशुद्ध अवस्थेत आला आढळून.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
शिव रेसिडेन्सी लॉज नाना पाटील चौक फलटण येथे बेशुद्ध अवस्थेत एक विसम आढळून आला शेजारील गाळाधारक मालकांच्या लक्षात आल्यानंतर सातारा 24 तास प्रतिनिधी राजेंद्र मदने यांच्याशी त्वरित दूरध्वनी वरून संपर्क साधून त्यांना बोलवून घेण्यात आले.व त्यांनी समोरा समोर पाहिल्यानंतर तो इसम बेशुद्ध अवस्तेत दसल्याने ताबडतोब प्रतिनिधी राजेंद्र मदने यांनी फलटण पोलीस ठाणेशी दूरध्वनी वरून संपर्क साधून त्या ठिकाणची सत्य परिस्थिती सांगितले नंतर लगेच हवालदार संदीप लोंढे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन व्यक्तीची पाहणी केली. त्या इस्माच्या जवळ असणारी ब्याग तपसली असता त्यामध्ये त्या इस्माचे आधार कार्ड मिळाले.तो इसम सोलापूर जिल्ह्यातील भाबूर्डे गावचा रहिवासी असून त्याचे नाव हणमंत भोजलिंग काळेल असे आहे.आधार कार्ड वरून त्याच्या गावाकडील नातेवाईक यांच्याशी दूरध्वनी वरून त्या इस्माची ओळख पटवून दिल्यानंतर त्यांचे नातेवाईक आम्ही लगेच निघुन येतो असे सांगितले असता फलटण ठाणेचे हवालदार संदिप लोंढे यांनी 108 या नंबर वर कॉल करून अंबुलन्स बोलावण्यात आली व त्या इस्मास 108 मधून सरकारी फलटण येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. हवालदार संदीप लोंढे साहेब यांनी तात्काळ भेट देऊन इसमास जीवदान दिल्याने येथील कॉम्प्लेक्स मधील गाळाधारकांनी हवालदार संदीप लोंढे व त्यांचे सफाई कामगार कांबळे यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment