स्वतंत्रतेतील मीठ भाकर चांगली पण स्वैराचारातील आराजकता आम्हा भारतीयांना कोठे नेणार:-ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडेबडवे.

स्वतंत्रतेतील मीठ भाकर चांगली पण  स्वैराचारातील आराजकता आम्हा भारतीयांना कोठे नेणार:-ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडेबडवे.

पुसेगांव प्रतिनिधी, पंकज कदम.

      इंग्रज परकीय आणि  जुलमी होते. त्यानीं आम्हा भारतीयांनां गुलामा सारखे, मेढंरा प्रमाणे वागवलं.पण त्यानीं जेवढं आमच्या देशाला,समाज्याला लुटलं नाही. लुबाडलं, नांडल नाही..?तेवढं आज आमचीच माणसं आम्हाला लुटताहेत..? हे पत्रकार म्हणून उगाच मनात येते आहे.स्वतंत्र तेतील मीठ भाकर चांगली म्हूणन आम्ही परकीय, जुलमी इंग्रजना पिटाळले..? पण आमच्यातील परकीय विचारांच्या लोकांना, कोण..? कसे..? अन,कुठे हकलणार ..
         मध्यतंरी लाचलूचपत च्या जाळ्यात, न्यायाधीश, तहसीलदार, तलाठी, पोलीस, बांधकाम अभियंता (यादी अजून ही वाढेल..?) अडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पत्रकार म्हणून मनाला खूप यातना झाल्या. ही सर्व अधिकारी मंडळी आपलीच आहेत..! नव्हे घरची वाटतात..? या पुढे जाऊन चर्चेत समजले, कीं यातील काही भाग संमधीत वरिष्ट खात्याचे अधिकारी, अन काही भाग,पदाधिकारी,पुढारी,लोकनेते यांचे पर्यंत पाकिटाने जात असतो..? अक्षरशः मनाला यातना झाल्या..? हे नक्की कोण थाबंविणार..? हेच काम प्रशासकीय अधिकारी यांचे आहे.. नां.?. काय असतात सुसंस्कर..? तें केव्हा केले जातात..? तें कोण करतात..? आणि तें केव्हा वापरायचे असतात..? अनेक जटील प्रश्न मनाला पडत होते.? बरे एखाद्या कोतवालानें चहा पाण्याची मागणी केली तर मान्यही करता येईल हो.?बिचाऱ्याला वेतन खूप कमी असते. घरात दहा जण (पोसायची) संभाळावयाची असतात. पण ज्यांना, पद भरमसाठ पैसा, मान, मरातब, प्रतिष्ठा असते. त्यानीं हा भिकारी पणा करावा..? छे..!तरी बरे,  आता ऑनलाईनपगार,आणि किमान 500 पुढे नोटा आहेत. अन्यथा पगाराचे सुट्टे नाणे करून दिलेच..? तर अनेकांना पगाराचे ओझे जाणार ही नाही..? अशा लोकांनी लाच मागावी..? ही भिकारी वृत्तीच .
       श्रीमंती म्हणजे कायअसते  ती कशा, कशात मोजायांची असते..? फक्त हव्यास. चंगंळवाद..?लुटालूट  म्हणजे श्रीमंती..? किमान.. "'जनाची तरी थोडी बाळगावी..?" वागणे तर विचारूच नका..? जोकर, विदुषी सारखे..? म्हणतात नां.? "पचेल तें खावे,आणि शोभेल तें ल्यावे" काही ही पचवायचे ही अचंबीत करणारी सवय अशीच लागते का ..? हे खरं आहे.कीं व्यक्ती अभिस्वातंत्र्य आहे. कोणी कसे वागावे..? कसे रहावे..? हा वैयक्तिक ज्याचा त्याचा  प्रश्न आहे. पण तुम्ही ज्या प्रशासकीय खुर्चीवर बसता ती सर्वसामान्य जनतेची आभिमानाची, आदर्शवत जागा आहे. त्या खुर्चीचा अपमान, हेळसांड हे लोकशाहीचा चौथा स्तभं असणाऱ्या माझ्या सारख्या  जेष्ठपत्रकाराला वेदनादायी वाटते.सर्वजण तसे नाहीत, याला खूप अधिकारी अपवाद आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब यांनी सर्व सामान्य व्यक्ती केंद्र बिंदू म्हणून मानवाधिकार, पदाधिकार, बहाल केला..? तो याच साठी..? मग  कशासाठी थोडा विचार करायला हवा ..? परकीय जुलमी इंग्रजाना पिटाळता आले. पण या आपल्या,नव्हे घरच्या माणनासानां कोणी,..? कसे..? अन काय सांगावे..? या पेक्षा दुर्दैव म्हणजे उद्याच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक  दिनी अनेक चारित्र्य हनन असलेल्या खोट्या प्रतिष्टीत  व्यक्तीच्या हातून तिरंगा फडकविला जातो..? अर्थात तिरंग्याची शान त्या मुळे नक्कीच कमी होत नाही. पण हे ही मनाला कुठे तरी कायम खटकते..? तिरंगा फडकवाणारी व्यक्ती देखील, निस्वार्थी त्यागी, आदर्शवादी, असावी..?आणि मग कधीतरी पत्रकार म्हणून मनात विचार येतात स्वतंत्रतेतील मीठ भाकर चांगंलीच.पण  स्वैराचारातील आराजकता आम्हा भारतीयांस कोठे नेणार आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.