मुरूम येथे गांडूळखत तयार करणे या विषयावर प्रात्यक्षिक.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण दि.२५/१२/२०२४
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये गांडूळखत व त्याचे फायदे तसेच गांडूळखत बनिवण्याची प्रक्रिया या विषयावर प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन.या प्रात्यक्षिक द्वारे कृषी दुतानी गांडूळखत म्हणजे काय तसेच गांडूळखतपासून होणारे विविध फायदे तसेच गांडूळखत मध्ये असलेले विविध सूक्ष्म घटक याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच गांडूळखत बनविताना कोणती पद्धत योग्य व सोपी आहे याबद्दल माहिती दिली. तसेच गांडूळखतनिर्मिती साठी लागणारे विविध साहित्य तसेच शेणखत याबद्दल देखील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड व तेजस गाढवे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.
Comments
Post a Comment