सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी संतोष पाटील यांची नियुक्ती.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सातारा नवीन जिल्हाधिकारी संतोष पाटील हे मूळचे उंडेगाव (ता. बार्शी) येथील आहेत. कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली. 1996 मध्ये त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) व प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यामध्ये पांढरकवडा, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून 2016 साली बढती मिळाल्यानंतर त्यांनी 2016 ते 2018 या काळात नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. 2018 ते 2020 या काळात पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तेथे त्यांनी 2022 पर्यंत काम पाहिले.
Comments
Post a Comment