रावडी बु. येथे कृषिदूतांकडून किसान क्रेडिट कार्ड व पीककर्जाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.
रावडी बु., ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पीककर्ज याबद्दल माहिती सांगितली.
साखरवाडी मधील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये व सोसायटी मध्ये कृषिदूतांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पीककर्ज योजनेबद्दल माहिती घेतली, तसेच कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती सांगितली. तेथे बँक मॅनेजर, विकास अधिकारी व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, शेंडगे सार्थक यांनी हा कार्यक्रम राबविला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नितीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment