खामगाव येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना बागायती शेती विषयक ॲप्लिकेशन बद्दल माहिती.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण तालुक्यातील खामगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक ॲप्लिकेशन यांच्या माहिती संबंधी प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमा वेळी कृषिदुत पिसाळ रविकुमार , सकट उत्कर्ष , थोरात चरण , ठोंबरे सौरभ , फरांदे संकेत, धायगुडे प्रणव , तूपसौंदर ओंकार, वडणे अथर्व यांनी मोबाइलमधील शेतीविषयक विविध अप्लिकेशन्स जसे की ऍग्रीसेंट्रल ॲप, ICAR ॲप , कृषिक ,ॲग्रॉस्टार, इ. ची ओळख शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे करून दिली.
या अप्लिकेशन्सद्वारे बागायाती पिक लागवड ,चालू बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते यांच्या चालू बाजारभाव, प्रगतशील शेती व हे अप्लिकेशन शेतकऱ्याला शेतीचे अर्थनियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी कसे मदत करतात, याविषयी माहिती दिली. कृषीदुतांनी हे अप्लिकेशन्स मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment