मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची घेतली सदिच्छा भेट.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री पदी निवड झाल्यानंतरचीही प्रथमच भेट असल्या कारणाने त्यांनी अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्षाने ग्रामविकास मंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल असा शब्द त्यांना दिला.यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment